माणसांची परीक्षा कशावरून ?
आजकाल सोसायटी मध्ये एक पद्धतच पडून गेली आहे. माणसाची परीक्षा पैश्या वरून करणे. एखाध्या माणसाचा स्वभाव, त्याचे गुण, त्याचे कर्तुत्व या गोष्टी नगण्य होऊन गेल्या आहेत. कोणीतरी येतो, त्याचे मोठेपणा सांगतो, माझी फाक्टरी आहे, माझी गाडी आहे, माझा बंगला इतका मोठा आहे ..... झालं ..... लोक लगेच त्याच्या मागे लागायला सुरूच.... पण तो कसे कमावतो, तो स्वतः कमावतो की त्याच्या वडिलांनी त्याला सेट केला आहे, आयत्या पिठावर रेघोट्या आहेत काय ? याचे देणे घेणे कुणालाच नसते. त्याची चापलुसी करण्यात धन्यता मानणारच बहुसंख्य वर्ग आहे.
माझ्या मते ही विचार करण्याची प्रवृत्ती बदलली तर समाजामध्ये बरेच चांगले बदल होतील. पण विचार कोण करणार ?
No comments:
Post a Comment